जमाखर्च
जमाखर्च
आठवणीत तूझ्या, काळ खूप लोटला.
दुःखाने माझा वाटा, इमाने इतबारे वाटला.
वाटणी झाली आयुष्याची, पर्वा नव्हती कधी जगाची.
साथ सोड्शिल अर्ध्यावरती, एवढी घाई काय सुटण्याची.
सोडलं तर खर मग, काळजीचा सूर का लावतेस.
अधून मधून तिसऱ्या वाटेला, तूच तर मला पावतेस.
तक्रार नाही कोणाची, कदाचित तस व्हायचच असेल.
विधिलिखित वाणीमध्ये, आपला शेवट एकत्र नसेल.
शेवट दोघांचाही होनार, कारने लागतील कित्येक.
काळ जरी विरत गेला तरी, आठवण सांभाळली प्रत्येक.
सगळे हिशोब तू केलेस, बाकी काही शिल्लक नाही.
आयुष्याचा व्यवहार केलास तू, सुखांचा जमाखर्चच उरला नाही.
