जखमी
जखमी
1 min
318
जखमी मी झुंजत होते स्वतःशी
बाहेरच्या नकारत्मक शब्दसोबतीत!
नव्हते बळ परतवण्या ते शब्दमारा
आतुन स्वतःला तेवत ठेवत
तयार करत होती नविन ऊर्जा
सोबत दिसत गेले एक एक
सकारत्मक़ शब्द शृंखला!
शब्द हे असे अवती भवती फिरत असतात
प्रसंग कोण कुठला
जखमेवर मिठ चोळायला नकारी शब्द
जखमेवर मलम लावण्या सकारी शब्द
शब्द सोबत मीच निवडायची जखम पुसण्या!
