जिवन फक्त एक प्रवास
जिवन फक्त एक प्रवास
1 min
23.7K
....खुले आकाश सारे पण
कोंडलेला श्वास होता
काहि नाहि फक्तच दोन -चार
दिवसाचा प्रवास होता ...
...पडला खुप सारा पाऊस
पण उन्हाचा त्रास होता त
काहि नाहि फक्तच दोन चार
दिवसाचा प्रवास होता ...
...समोर वाढलेले पंचपक्वान ,पण
दुसराचा चोरलेला घास होता
काहि नाहि फक्तच दोन चार
दिवसाचा प्रवास होता ...
....सुकलेली फुले होती सारी
पण त्यातलापण सुवास होता
काहिनाहि फक्तच दोन चार
दिवसाचा प्रवास होता ...
....थोडे सत्य पण बहुत सारे
तर फक्तच आभास होता
"जिवन " म्हणजे दोन चार
दिवसाचा प्रवास होता ....
