जिवलगा
जिवलगा
1 min
379
जिवलगाच्या ओढीने
जीव झालाय व्याकुळ
विरहानंतर मन झालेय
मिलनासाठीच आकूळ
जिवलग सखा तू माझा
प्रेमाचा वर्षावच तुजवर
अलवार फुलता भावना
पर्णोपर्णी सांडले दहिवर
तुझ्या सुखासाठीच मी
सोडिले हे प्रेमळ माहेर
प्रसवूनी दोन गुणी पुत्र
दिला वंशवेलीचा आहेर
निशीदिनी सजवते तुझा
सुखाने घरभरला संसार
प्रीतीच्या रेशीम बंधानेच
शिंपिते मुग्धप्रेमाचे तुषार
सांजरात होता आयूष्याची
होतील शिथिल गात्रे कांती
जिवलगा तुझ्याच घट्ट हाती
काटीन उरलेल्या सायंराती
