जिव्हाळा
जिव्हाळा
1 min
202
नाते तुझे माझे जिव्हाळ्याचे
आपुलकीचे, प्रेमाचे
मायेचे, ममतेचे
सुगंधापरी फुलांच्या सदा बहरणारे
पडणाऱ्या पावसाचे अन् झेलणाऱ्या धरतीचे
घेतला जन्म उदरातून तुझ्या
व्हावे गोंडस फुल जसे उमलणाऱ्या कळीचे
वाढले संस्कारात
तुझ्या मोठे झाले
शोभावे दारी जसे तोरण त्या फुलांच्या पाकळीचे
सदैव लाभो असाच जिव्हाळा
तुझा मला मिळते जसे पाणी सागराला वाहणाऱ्या नदीचे आजन्म राहीन तुझीच
बनून मी दासी
नाते जसे असते मातीशी झाडांच्या मुळांचे
आहेत आई इतके
उपकार तुझे मजवर
नाही फिटणार कधी पांग तुझ्या उपकाराचे
