जिव्हाळा कोठे भेटेल. ..!
जिव्हाळा कोठे भेटेल. ..!
1 min
468
जिव्हाळा कोठे भेटेल
हौस कोठे फिटेल
संसार कोठे नटेल
सौख्याचा नारळ कोठे फुटेल
याचीच वाट पाहण्यात
जन्म सारा सरतो
थकून भागून
श्रीहरी तुझे चरण धरतो
जिव्हाळ्याची तहान
आता पूर्वी सारखी भागत नाही
प्रेमाची वणवण काही थांबत नाही
डिजिटलच्या युगात
अंतर फार वाढल
हातावरच अंतर कोसावर गेलं
होत नव्हतं ते नात
आता बोटावर येऊन बसलं
चार चौघांची पंगत
आता पिझ्झा बर्गरच्या पॅकवर थांबली
खरचं बाबा प्रगती ही
फार फार झोंबली....!
