जित्रप
जित्रप
1 min
11.8K
धागा मैत्रीचा रेशमी
मऊ सुद हवाहवासा
विश्वास हवा त्यात
दुरावा सदा नकोसा
मैत्री फक्त माणसातील
मुके जित्रप पण करतात
निभावतात प्राण पणाने
न बोलता भावना व्यक्त होतात
प्राणी साथ देतात एकमेका
संकट असो त्यावर कोणतेही
जीव ना जपत स्वतःचा
सोबती असो कोणत्या जातीचाही
