जिंदगी जिंदगी
जिंदगी जिंदगी
1 min
436
कधी असतो नुसता ताप,
कधी असते पावसाची धार,
कधी असतो गारठा प्रचंड,
जिंदगी कधी फुललेली,कोमेजलेली.
कधी होतो विस्तव लाल,
कधी असतो कोळसा,काळा,
पौर्णमेला चांदणे असते,
आणि अमावास्या काळीकुट्ट.
हे फिरते चक्रच आहे.
कधी कोवळ्या वयात,
गोर्या गालावर काळी मिशी येते,
आणि अहंकाराचा पीळ,
खूप पडतो,मिशीला,
आणि मिशी, होते पांढरी.
जिंदगी बदलत जाते,
वेळ बदलत जाते,
कधी सूर्योदयासारखी,
कधी सूर्यास्तासारखी,
जिंदगी जिंदगी.
