जिजाऊ मातोश्री.
जिजाऊ मातोश्री.
सात पिढ्यानंतर कन्या आगमन,
म्हासळ्या-लखुजीचे जीवन पावन.
उल्हास,आनंदाचे वाड्यात वातावरण,
पाहुन भव्य-दिव्य अदभुत कन्यारत्न.
बालपनीच अस्त्र,शास्त्र राजनितिचे शिक्षण,
योध्दा मालोजींची झाली ती होणहार,निपुन सुन.
जिजाउ-शाहाजीने पाहिले स्वराजांचे स्वप्न,
स्वप्न्पूर्तीसाठी मधेच सुखी-संसाराचा त्याग करुन.
बालशिवाला दिली पुने जागिरिची कमान,
अहोरात्र परिश्रमाने घडविले छत्रपति महान.
शिवांच्या मित्रांसाठी विशाल केले मन,
शिवातुल्य केले प्रेम सर्वांना एकसमान.
मावळ्यांना चुकवायचे आहे मातीचे ऋण,
स्वराज्य निर्मितीचे दाखवले विशाल स्वप्न.
भगवा झेंडा असेल स्वराज्याचे निषाण,
भगव्यासाठी द्यावे मावळ्यांनी बलिदान.
छत्रपतींना केले सतत स्वराज्यासाठी मार्गदर्शन,
जिंकले अनेक गडकिल्ले व आदिल-मौगली वतन.
न्याय,समता, बंधुत्वाचे केले स्वराज्य स्थापन,
शिवाला केले छत्रपति चित्पावन भटांचे षडयंत्र हानुन.
रयतेच्या सुखासाठी झिजवले सतत आपाले देह्प्राण,
शिव-राज्याभिषेका नंतरच सोडले माऊली ने प्राण.
शाहाजी सोबतच सती जाण्याचा केला प्रण,
खाली हात न जाता नेले नंतर स्वराज्याचे वान.
स्वर्गात बसले असेल शिल्पकार मांडुन ठान,
स्वराज्याचे मी करिनं वान शाहाजीला दान.
बघुन बत्तीस मनाचे सोनाचे स्वराज्यचे सिंहासन,
शिवा झाला छत्रपति सिंहासनवर विराजमान.
