STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

4  

Prashant Tribhuwan

Others

जीवनप्रवास

जीवनप्रवास

1 min
429

कधी सुख तर कधी दुःख

असाच हा चाले लपंडाव

कधी शेवट या प्रवासाचा

कुणालाच नाही इथे ठाव


कुणी देते साथ चालताना

कुणी नुसते ओझे होतात 

स्वतःचा स्वार्थ सार्थ होता

सारे एकटे सोडून जातात


पडलो एकटे आपण तरी

अटळ हा प्रवास चालणे

आपल्या यशाचे ताळे आता

लागणार आपल्याला खोलने


जीवनप्रवास करताना बघा

अनुभवाच्या शिदोरी मिळते

लागता च ठोकर अपयशाची

आपल्याची ही नियत कळते


Rate this content
Log in