STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

जीवनप्रवास आणि घोरणे..!

जीवनप्रवास आणि घोरणे..!

1 min
101

घोरण्याचं मला कधी

कौतुक वाटलं नाही

कधी वावडं वाटलं नाही

कधी नवल वाटलं नाही

कधी घृणा वाटली नाही

कधी अप्रूप वाटलं नाही

कधी उणीव भासली नाही

कधी जाणीव झाली नाही

कधी प्रेम वाटलं नाही

कधी स्नेह जडला नाही

कधी वैरत्व निर्माण झालं नाही

कधी मैत्री झाली नाही

कधी विजय झाला नाही

कधी पराजय झाला नाही

कधी तह झाला नाही

कधी पलायन झालं नाही

काही द्वंद्व झालं नाही

कधी गळाभेट झाली नाही

पण ओळख मात्र झाली

एक सुंदर कला म्हणून

तो रंग रेघोट्यांच्या

पलीकडचा कलाविष्कार आहे

लयीची नागमोडी वळणं

मधेच स्वरांचा खड्डा

आणि पुन्हा लयीत चालणं

आणि थोडं थोडं पळण

एखाद्या वळणावर

कर्कशपणे ब्रेक लावणं

नाहीतर उगीचच

टायर घासत रेटणं

सारं कसं एक सुंदर

रात्रीचं मातेरं करणारं


पण तरीही

ती रात्र प्रेमानी जागवणारं

जीवनात कोणीतरी

जागं राहणं भाग पडतं

तेव्हाच अशी घोरण्याची

चित्रशिल्प पहुडलेली पाहता येतात


अखंड कलाप्रवास

मी आनंदाने केला

तेव्हा कोठे हा संसार

दोरीवर पण उभा राहिला


खरेच परमेश्वरा मला

घोरण्याचा राग नाही आला

कारण त्या घोरण्यामुळेच मी

आजवर जागता पहारा दिला

इतकं मात्र कळलं मला

दुसऱ्याचं सुख हे आपलं सुख असतं

कारण घोरणारं कुटुंब हे आपलंच असतं

त्या मुखात आपलं सुख असतं...!

                आपलं सुख असतं..!!!


Rate this content
Log in