जीवननीर
जीवननीर
1 min
313
अमृतघट
थेंब थेंब अमुल्य
जीवनपट
जीव अधीरे
पाण्याच्या थेंबावीन
निरर्थक रे
निसर्ग ठेवा
बहुमोल पाण्याचा
भू-गर्भ मेवा
पाण्याचा साठा
ही गरज काळाची
ही मानवाची
धुंद सरींचा
अभिषेक जलाचा
रानमाळात
कष्टकऱ्यांच्या
शेतात बरसावे
धान्य पिकावे
घामाचे मोल
माझ्या कष्टकऱ्याचे
जाण नित्याचे
जाणावे मनी
जीवन हेच पाणी
मोल जीवनी
