STORYMIRROR

Varsha Kendre

Others

3  

Varsha Kendre

Others

जीवनी रंग भरू या

जीवनी रंग भरू या

1 min
182

 सप्तरंगी न्हाऊन

 जीवनी रंग भरू या

 माणुसकीच्या रंगांनी

 प्रेमात सजू या


 राधा कृष्ण रास चाले

 आकर्षक वृंदावनी

 झाडवेली बहरली

 फुलली पानोपानी


 रंग फुलांचे सडे अंगणी

 भिजुनी चिंब होऊ या

 गालो गाली दिसू दे लाली

 साद सुरांचे घालू या


 एकमेका रंगवुन सारे

 आनंद मनीचा घेऊ या

 धुलीवंदन सण उत्साहाने

 चला साजरा करू या


साहित्याला गुण द्या
लॉग इन