जीवनी डंख सोसले
जीवनी डंख सोसले
1 min
195
विश्वासाने जीवनी डंख सोसले
वाट एकटीची तिमिर सारले
काळे मेघ हे ह्रदयात दाटले
सप्तरंग माझ्या डोळ्यात साठले।।
बहराचे उधान आले व गेले
सारे पांग मी वेदनेचे फेडीले
माझ्या सुप्त गुनानां उधान आले
तृप्त वृंदावनात मोर नाचले ।।
वार अनाहूद सफल जाहली
एकटीची लढत नभी भिनली
सुनी वाट काळोखाने या घेरली
तेंव्हा मी स्वताच चकाकून आली।
