STORYMIRROR

Monali Kirane

Others

3  

Monali Kirane

Others

जीवनधारा

जीवनधारा

1 min
239

होरपळलेल्या धरणीवर हिरवाईची थंड झूल,

मातीच्या गंधामधून पावसाची चाहूल.

लेखणीतून पाझरणा-या शब्द धारा,

ओसंडून वाहणारा स्तब्ध किनारा.

उत्साही जलधारा जीवनमय आनंद,

वसुधेला लागलेला नवनिर्मितीचा छंद.

कोसळणा-या पावसाला जिरवून पोटी,

मोत्यांच्या दाण्यांमधून रीती करते ओटी.

जीवनचक्र युगांपासून नाही त्यास अंत,

येणे आणी जाणे त्याची नका करू खंत.


Rate this content
Log in