जीवनाच्या वेदना..
जीवनाच्या वेदना..
भूक भाकरीस येथे पोटास उपवास आहे,
भरले कुणाचे पोट कैकास इथे उपवास आहे.
येथे तहान आहे अथांग पसरलेल्या सागरासही नाही कुणास जाण येथे प्याला रिता ओठास आहे
आहेत येथे कणाकणास अन्नाच्या तडफडणारे,
धान्य अजुनही तरी त्यांच्या भरलेले गोटास आहे
नाहीच कोणा कळवला येथे आजन्म भेदभाव,
अडकले जे रेंदात त्यास वाचवणारा कोण तटास आहे.
आंघोळ खाली फवार्याच्या वाहत नाले तुडुंब,
दिसले कोणास कधी त्यांच्या छेद छतास आहे.
दरी आजही आहे यांच्यात गरीब श्रीमंतीची
मानावे इथे सर्वांस सारखे प्रार्थना माझी सर्वास आहे.
