जीवनाचे रंग
जीवनाचे रंग
1 min
351
रंगभूमी जीवनाची खूप मोठी आहे
इथे कोण करतो नेटका अभिनय
तोच राजा आहे...
जीवनरूपी रंगभूमीवर नाटके येती अनेक...
बोचती काटेही तितके ,
वाजता टाळ्या समीप...
खऱ्या माणसाची इथे ,नसतेच खरी ओळख
हीच आहे जीवनरूपी रंगभूमीची मेख...
अभिनयसम्राट जो झाला इथे यशस्वी
तोच जिंकेल शिकेल
जीवन जगण्याचे रहस्य,,
जीवनरूपी रंगभूमीवर कधी
साकारावे पात्र माणुसकीचे...
जगण्याला दिशा दयावी अशी की,
जगणे असावे समाधानाचे!!!
