STORYMIRROR

Pratibha Bilgi

Others

3  

Pratibha Bilgi

Others

जीवनाचे कोडे

जीवनाचे कोडे

1 min
447

जीवन का असे ?

एक कोडे , न सुटलेले

सोडवता - सोडवता 

अजूनच गुंतत जाणारे 

या गुंतलेल्या धाग्यांचे 

सतत चिंतन करणारे 


हे जीवनच असे

कधीच न उलगडणारे 

उलगडता - उलगडता

नवीन कोडे गुंफणारे 

अशा गुंफलेल्या कोडयांचे 

कसून उत्तर शोधणारे 


कसे वैविध्यमय हे जीवन

स्वतःचे विविधता जपणारे

जपता - जपविता 

पुढे पुढे चालणारे 

असे हे निरंतर जीवन

संपूनही न संपणारे 


Rate this content
Log in