जीवन
जीवन
1 min
215
आयुष्य आहे किल्ल्यासारखं
एक एक बुरुज सर करत जायचं
आयुष्य आहे दिव्यासारखं
तेल संपेपर्यंत आनंदात तेवायचं
आयुष्य आहे काट्याकुट्यांचं अडचणीचं
आशीर्वाद शुभेच्छांनी पार करायचं
आयुष्य आहे युद्धासारखं
कोर्टाने लक्ष्य गाठायचं असतं
आयुष्य आहे मायेचं प्रेमाचं
प्रेमानेच ते जिंकायचं असतं
आयुष्य आहे अनेक सहकाऱ्यांचं
कधीच त्यांना विसरायचं नसतं
आयुष्य प्रत्येक क्षणाला नवीन असतं
कारण क्षणाक्षणाला नवीन शिकायचं असतं
शेवटी आयुष्य असतं त्या विश्वेश्वराचं
त्याला मात्र कधीच वीसरायच नसते
आयुष्यात किती जगणार या विचारापोक्षा
कसे जगायचं हे ठरवायचं असतं.
