जीवन
जीवन
1 min
321
कधी ऊन, कधी सावली
कधी पाऊस, वारा
जीवन म्हणजे भल्याबुऱ्या
अनुभवांचा पसारा
नात्यांची गुंफण अन्
त्यात अडकलेले मन
सुखामागे धावून
आयुष्यभर वणवण
कधी हार, कधी जीत
कधी पचवायला लागतो पराभव
आळीपाळीने खेळत असतो
जीवनाच्या सारीपाटावर डाव
कधी डबडबतात डोळे
कधी सुखाचे चेहरे
जीवन आहे चालायचेच
हसू, गाऊ आपण सारे
