STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

जीवन

जीवन

2 mins
281

आज आपल्या देशात बिकट व कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे परिवर्तन हा सृष्टीचा नियमच आहे. आपल्यालाच बदलत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. जगामध्ये शास्वत काहीच नाही सर्व काही नश्वर आहे आपण आलो एकटे आणि जाणार एकटेच आहे म्हणूनच.... 


आभार माना ईश्वराचे

सुंदर दिले जीवन

 त्याने हे वरदान या भूमीवरचे  

दिला सभोवताली निसर्गसुंदर

 ऋतू पण दिले निराळे आचार-विचार हे प्रत्येकाचे 

आहे वेगवेगळे

 मग...

न घाबरता न डगमगता 

परिस्थिती कशीही 

असो निश्वास जगा...


 हे जीवन आहे क्षणभंगुर 

 त्याचा सदुपयोग करून बघा  

जीवनात म्हटल की असतं 

 थोडं दुःख थोडं सुख 

झेलून बघा कधी खळखळून हसून दुःख हे थोडं 

विसरायला शिका 

मनाला योग्य वाटेल तेच करा 

योग्य वाटेल ते सोडून द्या

 न घाबरता न डगमगता जीवन जगा... कधी वाऱ्यासारखे भिरभिरून बघा 

कधी पावसामध्ये 

अलगद भिजून बघा 


फुलांचा सुगंधासारखं कधी दरवळून बघा 

आवडीचे गाणे कधीतरी

 गुणगुण करून बघा  

दुसऱ्यांवर आपुलकी प्रेम करायला शिका

 स्वतःसाठी पण थोडा 

जगायला शिका

 हृदयातल्या प्रत्येक पान उलघडून पहा

 स्वार्थ अहंकार गर्व गैरसमज या 

सगळ्यांपासून जरा दूरच राहा  

घेतांना नेहमीच हात असतात आपले पुढे

थोडं कधी द्यायला शिका घेण्याबरोबर देण्यात ही आनंद असतो 

जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका  

चांगल्या कामाला नेहमी द्या पाठिंबा त्यात अडथळा आणू नका

कोणाला प्रोत्साहित करता येत नसेल तर निदान 

नाउमेद तरी करू नका मान्य आहे 'आपण आहोत

आपल्या जीवनाचे शिल्पकार' पण देवावरील श्रद्धा कधी सोडू

नका कारण जेव्हा सर्व उपाय संपतात

तेव्हा तोच आपला आधार असतो हे मात्र विसरू नका


 जीवन म्हणजे काय...? घ्या एकदा समजावून 

कधी चांगलं कधी वाईट होणारच हे आपल्या कृतीवर असत अवलंबून 

जगताना आपण कसे जगलो याचा पहावा थोडा विचार करून 

जीवन आहेच एक संघर्ष प्रयत्न केला तरच होईल उत्कर्ष  

या जीवनाचा रंगच आगळावेगळा

 कोणाला नाही होत याचा सहज उलगडा 

शब्दांपेक्षा भावनेचा

 समजून घ्या अर्थ 

जीवन ठरेल सार्थ नाही 

तर जीवन आहे व्यर्थ 


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍