जीवन
जीवन
1 min
219
जीवन असती क्षणभंगुर
आयुष्यच झालेय नश्वर
जीवन जगविते मानवा
वृक्षारोपणात भेटे ईश्वर
दावा मांडला कोरोनाने
ठाण मांडूनिच बसला
दावा वृंदावनीचा मेळा
कृष्णकान्हा इथे वसला
जीव जडला तुझ्यावर
आलीय मिलनाची वेळ
जीव गमावला आप्तांनी
कसला जीवनाचा खेळ
मान नको वळवू सख्या
लाजलाजूनी झाले लाल
करा मानसन्मान आमचा
देऊनीच श्रीफळ न् शाल
जीवन- आयुष्य ,पाणी
दावा - वैर ,दाखवा
जीव - मन,श्वास
मान - शरिरावयव,इज्जत
