जीवन
जीवन
1 min
372
सुंदर आहे जीवन आपुले
मजा चाखूया थोडी SS
बाहू मधल्या स्वबळावर
भरू जीवनात गोडी
अनेक संकटे पुढ्यात जरी
पुढेच नेऊ होडी
सहज नसते सारे काही
साक्ष जुनी ती मोडी
संदर्भ तयाचे घेऊन सगळे
विजयाची हाकू गाडी
कुणास मिळती दुःख ढिगभर
कुणी बांधतो माडी
या दोघीच्या संगमा वरती
शिजते पुरण पोळी
पतंग घेतो उंच भरारी
ताण कधी तर ढिल्ली दोरी
या मार्गाने जाऊ आपण
कशास हवी मुजोरी
आनंदाने नाचू सगळे
सुख दुःखाची पाहू नाडी
जीवनातल्या या रंगात भिजूनी
खेळू आपण होळी
