STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

4  

Prashant Tribhuwan

Others

जीवन

जीवन

1 min
275

कुणास भासे हा संग्राम

कुणासाठी हि असे संधी

कुणाला मिळे सर्व काही

कुणा नशिबी नुसती आंधी


समजून जो जसे घेईल

तसे त्यांना हे जीवन भासते

जाताना सोडून हा देह इथे

आठवणीत उरायचे असते


पद ,पैसा आणि प्रतिष्ठा सर्व

क्षणभंगुर हे अखेरीस कळते

आलो होतो रिकाम्या हाती

जाताना तरी कुठे काय मिळते?


जगताना हे सुमधुर जीवन

उपकारांची जाण असू द्यावी

जे झिजले आपल्यासाठी नित्य

त्या आईबापाची काळजी घ्यावी


स्वतःसाठी जगणाऱ्या पशुपेक्षा

निस्वार्थी जगण्याला अर्थ आहे

जीवन पुष्प आपले देवाने स्वीकारावे

तर खरा जीवनात परमार्थ आहे


सोडून आता सारे दुर्गुण अंगीचे

सद्गुणांचा जीवनात संचार करावा

करेल मानव जीवन आपले उन्नत 

असा एक तरी विचार ध्यानी धरावा


Rate this content
Log in