जीवन
जीवन
कसे वर्णावे सार जीवनाचे
जीवन कधी सुखाचे कधी दुःखाचे
कधी जीवनात सुखांची जत्रा
कधी वाढतो संकटांचा खत्रा//१//
आत्म ज्ञान जीवनात मिळते
आयुष्य एका वळणावर थांबते
वाटा सुखाच्या शोधताना पुढच्या
दिशा बदलतात आपल्या मनाच्या//२//
स्वप्ने पळवतात माणसाला सदा
पळता, पळता वाढते मनाची द्विधा
जगताना जीवन, घडते बरेच काही
हाती थोडे अन् व्यर्थ जाते खुप काही//३//
जीवनाची बिकट वाट संपत नाही
माणसाला स्वप्नांचा थाट मिळत नाही
कळत नाही जीवनाचा अर्थ कुणाला
जगतो माणूस लावून प्राण पणाला //४//
जीवन आशेवर जगतो माणूस
कधी तुपाशी कधी उपाशी असतो माणूस
नकारात्मक विचार पाठ सोडत नाही
माणसाला हवे ते कधी मिळत नाही//५//
