जीवन यात्रा
जीवन यात्रा
1 min
314
सुखदुःखाचे बांधून तोरण
अरे माणसा तुझे कसले जीवन
अस्थी मांसानी शरीर सजले
निज अवयवानी सुंदर नटले
रसरक्ता नी तुला पोशीले
श्वेत कृष्ण कातडी चे पांगरुण
मांडलास तू जीवन व्यापार
गण गोताचा माया बा झार
पाप पुण्य कर्मा चा शेजार
निर्मिलेस जरी तू नन्दनवन
मोह मायेचा पिंजरा सजला
संसारी जीव एथेच रमला
झाली घालमेल घात झाला
आले यमाजी चे अवताण
चारचौघे घेती खां दयावरी
निघाली यात्रा यमाच्या दारी
प्रत्येक जण असतो त्या वाटेवरी
गुंडाळ ले तुला पांढरे कफ़न
उठ ऊठ प्रेता तिरडी सजली
गण गोत आप्त सर्वही जमली
कमी ज्यास्त सगळी रडली
धग धगते पेटले चित्ता सरण
अरे माणसा तुझे कसले जीवन
