जीवन साथी
जीवन साथी
1 min
247
का कुठून येतो पालटण्या जीवन साथी
जीवनी विश्वास नियमात जपे तोची खरा संसार घे निभुनी
परक्या घरचे धन येथे माहेर त्यागून
दोन्ही घराचा उद्धार करण्या राहते ठासून
नम्र स्वभाव, समजूतदार अलंकार असावी तिचे
अनंत काळाची माता सर्वांच्या वागणे एक मताचे
अहम आणि मी पणा केव्हाच नसावा
अन्यथा ग्रहण संसारात समजावा
विश्वास व सहानुभूती वर चाले परिपाठ संसाराचा
थोडा त्याग हळुवार मनाची रेशीमगाठ
