जीवन प्रवास
जीवन प्रवास
1 min
220
बोल बोबडे हवेहवेसे
स्वच्छंदी मनसोक्त मनसुबे
बालपण निरागस निस्वार्थी
साऱ्यांनाच प्रिय असे...
कर्तृत्व उजळे युवानाचे
कर्मे सातत्याने स्मरता
यशही आपसुक येई दारी
बुध्दिमत्तेचा कस लागता...
यौवनाचे वारे वाहता
सहचारिणी येई घरा
संसारवेलही आपसुकच बहरे
मुठीत येई अवघी धरा...
वय वाढता पुन्हा नव्याने
नातवासंगे आठवे बालपण
मनात उगीच चलचित्र झळके
जीवन प्रवासाचे एकेक क्षण...
