जीवन ना रंगभूमी
जीवन ना रंगभूमी
1 min
443
रंगभूमीच्या भूमिका
असतात तात्पुरत्या
जीवनातल्या भूमिका
कोणत्या खऱ्या नि खोट्या कोणत्या
हसऱ्या चेहऱ्यामागे
दडलेले असेल दुःख
आनंदी डोळे
शोधत असतील सुख
दुःखी ह्या चेहऱ्यात
खलनायक लपला असेल
समोरच्याला दुखवून
जो मनसोक्त हसेल
आयुष्याच्या ह्या रंगभूमीवर
कधी उगाच हसावे
मनात दुःख दाटले असता
ते लपवावे
कोणा उमगेल अर्थ जीवनाचा
क्रम आहे घटनांचा
जीवन नाही रंगभूमी
खेळही नसे भावनांचा
