जीवन म्हणजे काय असतं
जीवन म्हणजे काय असतं
1 min
1.4K
जीवन म्हणजे काय असतं
कसं जगायचं आपल्या हातात असतं...
एकमेकांसाठी जगायचं असतं
स्वतःचं मी पण विसरायचं असतं...
माणूस म्हणून जगायचं असतं
माणूसकीनं वागायचं असतं...
सुख हे वाटायचं असतं
दुःख हे भोगायचं असतं...
इतरांच्या सुखात सुख मानून
दुःखात सहभागी व्हायचं असतं...
सतत आनंदी राहायचं असतं
इतरांना आनंदी करायचं असतं...
जीवन,
यापेक्षा अधिक वेगळं काय असतं...?
