जीवन म्हणजे काय असते..
जीवन म्हणजे काय असते..


जीवन म्हणजे काय असते?
जीवन म्हणजे काय असते?
मित्र-मैत्रिणींचे प्रेमळ भाव जपणे
दुसऱ्यांच्या जीवनातील सुख दुःख टिपणे...
जीवन म्हणजे काय असते?
मुलात मूल होऊन खेळणे, बागडणे
दुःख असूनही दुसऱ्यांसाठी आनंद जीवन जगणे...
जीवन म्हणजे काय असते?
सजनाची उत्तम साथदार होणं
सुखदुःखात त्याच्या भागीदारी होणं....
जीवन म्हणजे काय असते?
वृद्धा आई बाबांचा आधार असणं
वृद्ध सासू-सासर्यांची काळजी घेणं...
जीवन म्हणजे काय असते?
अनाथ दुःखीतांची सेवा करणं
इतरांचे मनही मनापासून जपणं...
वसुधा वैभव नाईक, पुणे
मो. नं. 9823582116