जीवन माझेचं.....
जीवन माझेचं.....
1 min
170
रुसने तुझे मला
छळु लागले
जीवन माझेचं मला
जाळु लागले
शोधला विसावा
कुशित तुझ्या
ओठ निरागस ते
टाळु लागले
मानले कधी जे
आपले परक्यांना
कोण ते खरे हे?
कळु लागले
शोधात पहाटेच्या
संपेना ही रात
आता धीर माझे
ढळु लागले
झाल्या बोथट
संवेदना अंतरीच्या
चाहुलाने तरी मन
हळहळु लागले.
