जीवन हे क्षणभंगुर
जीवन हे क्षणभंगुर
जीवन हे क्षणभंगुर
कशाला बनतोस एवढा क्रूर
सगळीकडून निघतो नाराजी चा सूर
अरे वेड्या जीवन हे क्षणभंगुर
वाट दाविली भिमान
चालत रहा नीट गप्पगुमान
कशाला कायदा मोडतो
कशाला कुणाशी नडतो
अरे वेड्या जीवन हे क्षणभंगुर
जमिनीच्या तुकड्या साठी
भाव भावात काठा काठी
कशाला भावबंधाचे नातं तोडतो
वैर दावे कशाला तू उकरून काढतो
अरे वेड्या जीवन क्षणभंगुर
थोड्या क्षणांच्या आनंदासाठी
लाचलुचपत घेऊनि हाती
कशाला गरीबाला मारतो
तोच बिचारा दिनरात कष्ट करुनी पोट भरतो
अरे वेड्या जीवन क्षणभंगुर
पैसा दौलत क्षणांची श्रीमंती
त्यासाठी कशाला नाती तोडतो
अंतकाळी नाही येणार कुणी मग एकटाच रडतो
पैसे अडका यात काही मोक्षपद नसतो
अरे वेड्या जीवन क्षणभंगुर
शेवटी देह त्यागता कीर्ती मागे उरेल
हे मानवा सद् -विवेकाने काम जो करेल
करू नकोशी नुसती गुर गुर
अरे वेड्या जीवन हे क्षणभंगुर
