जीवन गाणे
जीवन गाणे
1 min
341
रुतला काटा हसली पाने
शाहरलेले जीवन गाणे
मृग सरींनी भिजली माती
गर्द गुलाबी त्या चांद राती
अलगद अवचित त्या थेंबानी
भिजली काय भिजली अवनी
कोण म्हणती होते ते तरा णे
भारलेले जीवन गाणे
श्वास उसवला उठला गन्ध
पेटली होती फुलवात मंद
सप्तसुरा ची झाली खळबळ
थेंब झेलती पाने सळसळ
असंख्य झेलीत मदन चाळे
बहार लेले जीवन गाणे
ऋतू येती दिस जाती
परंपरा सजवून जाती
क्षणाची ती कर्पूर आरती
सृजनशील नटली धरती
अनादी अनंत गायलेले गाणं
सरावलेले जीवन गाणे
