STORYMIRROR

Medha Desai

Others

3  

Medha Desai

Others

जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष

1 min
416

जीवन एक रंगभूमी आहे

आपण सारे त्यावरचे नट असतो

तेव्हा वेगवेगळ्या भूमिका साकारताना

माणूस स्वतःचे अस्तित्वच हरवून बसतो १


चेहरे आणि मुखवटे बदलताना

स्वत्वच मग माणूस हरवतो

आणि तेव्हा खरे आणि खोटे वागताना

स्वतःच्या जिवलग नात्यांना विसरतो २


कधी कधी चांगली भूमिकाही वठवतो

अगदी नटश्रेष्ठच होऊन जातो

पण स्वतःचे जीवन जगताना मात्र

कुठेतरी आनंद शोधत राहतो ३


या जीवनाच्या रंगभूमीवर काही वेळा

नायकाची भूमिका साकारावी लागते

तेव्हा खलनायकही त्याच्या वाट्यास येतो

त्याचा सामना करून सामंजस्य ठेवायचे असते ४


ही रंगभूमी झगमगीत, धकाधकीची

तिच्या प्रकाशाने दिपून नाही जायचे

वेळोवेळी सवय ठेवावी माणुसकीची

आणि दानधर्म,सेवाधर्म करीत रहायचे ५


कधी अंधार,तर कधी प्रकाशातून जाताना

न डगमगता मार्गक्रमण करावे

भूमिकांचे वेगळेपण जाणून घेऊन

तेव्हा स्वतःच आत्मपरीक्षण करत रहावे ६


Rate this content
Log in