जीवन एक संघर्ष - माझी लेखणी
जीवन एक संघर्ष - माझी लेखणी
असा कोणी आहे का नाव ऐकून
तोंडाला पाणी सुटणार नाही,
वडापाव नाही चारणाऱ्याला
देवही माफ करणार नाही......
गरम-गरम वडापाव किती
चवदार आणि चटकदार,
वडापावची पार्टी कितीतरी
असते हो रंगतदार.....
वडापावचा गाडा पाहून
स्वर्गानंद मिळून जातो,
हिरव्या-हिरव्या मिरचीसोबत
वडापाव शोभून दिसतो...
बटाट्याची खमंग भाजी
वर बेसनाचं आच्छादन,
टम् फुगतो तेलात मग
सुगंधीत होते मन....
आहाहा काय तो दिमाखदार
ऐटीत तयार वडा झालेला,
तूप लावून खरपूस तव्यावर
पांढरा पाव भाजलेला......
साज असा वड्याचा पाहून
मन मग लालचावतेच,
वडापावच्या वेडात सहज
तृप्ती मग सुखाची येतेच....
धुंद कोसळणारा पाऊस अन्
गरमागरम मजा वडापावची,
आयुष्याच्या प्रवासात याहून
कल्पना नसे दूसरी स्वर्गानंदाची
