जीवन एक रंगमंच आहे
जीवन एक रंगमंच आहे
1 min
282
जीवन एक रंगमंच आहे
येथे चालत राहणे आहे
जगने हे असेच असते
कधी दुःखाची डुबकी असते
तर कधी सुखाची झालर असते
सुखात आनंदाचे उधान असते
दुःखात अश्रुंचे गीत असते
जीवन एक रंगमंच आहे
येथे चालत राहणे आहे
अजस्त्र संकटे हरवायची आहेत
जगणे अवघड नाही
अस्तित्व टीकवायचे आहे
जीवन जगायचे आहे
जीवन एक रंगमंच आहे
येथे चालत राहणे आहे
जात -पात धर्म पंथ नाही
माणूस म्हणून जाहीर व्हायचे आहे
जगजेत्याला नमायचे आहे
माणुसकी जपायची आहे
जीवन एक रंगमंच आहे
येथे चालत राहणे आहे
