जीवन एक रंगभूमी
जीवन एक रंगभूमी
1 min
289
किती चेहरे
किती मुखवटे
कधी चेहरा खोटा
कधी मुखवटा खोटा
इथल्या प्रत्येक चेहऱ्यावर
इथल्या रंगभूमीवर
मुखवट्याचा खरा चेहरा शोधतोय
इथल्या रंगभूमीवर
सगळेच इथं उपरे
मुळांना पोखरू पाहणारे चेहरे
चेहरे ओरबडणारे मुखवटे
चेहरे आणि मुखवट्याच्या
या द्वंदाचत पुन्हा पुन्हा फसत जातोय
इथल्याच रंगभूमीवर
ख-या कुळाचा शोध घेणाऱ्या
कर्णाचा चेहरा शोधतोय
खोटा मुखवटा धारण करून
जगणाऱ्या कर्णाला शोधतोय
इथल्याच रंगभूमीवर
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
