जीवन एक रंगभूमी
जीवन एक रंगभूमी
1 min
152
जीवन आहे एक
रंगभूमी सुखदुःखाचे
रोज एक दिवस नवीनच
परिस्थितीशी लढण्याचे
हवंय काय जीवनात
बनलंय प्रश्नचिन्ह
शोधताना समाधान
हातपाय ही पडले सुन्न
सर्वांचे रंगमंच आहेत
आयुष्यात या वेगळे
जन्म-मरणाच्या अंतरातील
खेळ आहे सगळे
जीवन हॆ जगताना
पाप-पुण्यही घडे
कुणास ठावूक कुठल्या क्षणी
जीवन सोडून पळे
जीवन एक क्षणभंगुर आहे
कधी विसावा मिळे
आता वदते वाणी कुणाची
क्षणभरात बंद पडे
