STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

जीवन एक रंगभूमी

जीवन एक रंगभूमी

1 min
278

भावभावनांचा येथे अविष्कार आहे

जीवन ही रंगभूमी मानव कलाकार आहे


विविध भुमिकांचे खुले येथे दार आहे

दुःख असून हसणारा मानव कलाकार आहे


चेहऱ्यावर मुखवटे त्याच्या अपार आहे

खरे किती, खोटे किती तोच जाणकार आहे


कधी पडद्यामागे, कधी पुढे तो येणार आहे

तोचि इथे नट आणि तोचि कथाकार आहे


भुमिकांचा इथे तो खरा अदाकार आहे

अभिनयाने सा-यांना तो जिंकणार आहे


Rate this content
Log in