STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

4  

Sushama Gangulwar

Others

जीवन एक गणित

जीवन एक गणित

1 min
372

जीवनाचे हॆ गणित सांगा 

आजवर कुणाला चुकले 

खरे बेरीज, वजाबाकी सगळे 

या व्यवहारी जीवनातच शिकले 


किती नाती आयुष्यात 

अगदी मायेने जोडली जातात 

तिचं नाती एकदिवस 

अचानक वजा होतात.....


जीवनाचे हॆ गुंतागुंतीचे सुत्र 

कधी-कधी कळेनासं होतं 

कुणाला गुणावं कुणाला भागावं 

बाकी फक्त प्रश्न चिन्हच राहतं......


शेवटी जीवन एक गणित आहे 

त्याला टप्या-टप्याने सोडवावे 

कधी लसवी कधी मसवी 

जीवन असो कसेही आनंदाने जगावे......


जीवन गणित असो कितीही अवघड 

त्याला सकारात्मकतेने बघावे 

जिद्द आणि चिकाटीने योग्य आलेख 

पाहिजे तसा आपणच आखावे.......


जीवनाच्या या वर्तुळातील 

केंद्रबिंदू शोधून काढावे 

लक्ष केंद्रित करून त्यावर 

ध्येयाचा पल्ला गाठावे......


Rate this content
Log in