STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

जीवघेणा तणाव

जीवघेणा तणाव

1 min
466



जीवघेणा तणाव सोडावा,

मत्सराचा सराव सोडावा ...!


लाज थोडी मनात बाळगुनी,

लाटण्याचा ठराव सोडावा ...!


आळसाला नको मनी थारा,

रोज त्याचा प्रभाव सोडावा ...!


भास होता उगाच कसलाही,

भावनेचा उठाव सोडावा ...!


मोहमाया मनी नका ठेवू,

व्यर्थ सारा बनाव सोडावा ...!


वेदनेचा नकोच कांगावा,

दुःखदायी पडाव सोडावा ...!


वाकडे वागणे नको आता,

टोकण्याचा स्वभाव सोडावा ...!


ठाम तू निर्णयावरी असतो,

फक्त तो घूमजाव सोडावा ...!


' कर्म ' हा देव जाणतो तू मग,

' श्रेष्ठ मी ' हाच भाव सोडावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन