जीव दान
जीव दान
दान म्हणजे देणे ...
दुसऱ्याच्या पदरात काहीतरी टाकणे ....
दान खूप प्रकारची असतात ...
ह्या पुण्यकामात मदत करणारी काहीच लोक असतात ....
त्या एक महा दान आहे ...
त्या दानाची किंमत ही तेव्हडीच अनमोल आहे ...
लहानपणापासून जपत असलेल्या पोटाच्या गोळ्याचा तो प्रश्न आहे ...
परक्याच्या पदरात हे दान करताना काळजी ही आवरत नाही ...
आपल्या पोटाच्या गोळ्याला दुसऱ्याच्या स्वाधीन करताना अश्रू काही थांबत नाही ....
लहानपानापासून जपतात आपल्या मुलीला ते फुलाप्रमाणे ....
कधीही कोमजून जाऊ नये ते फुल असे असते त्याचे म्हणे ....
तिच्या चांगल्या भविष्यासाठी करतात ते हे दान ...
त्या साठी दिवस रात्र करत असतो बाप काम ...
आई चा पोटचा गोळा दूर जाताना दुटतो जीव ...
विचार करते ती अनोळखी माणसात कस रमेल माझ्या पिलूचा जीव ...
पण तिच्या सुखासाठी करतात आई बाप ही तडजोड ...
त्याचा या दानाला नाही कसली तोड ....
असे म्हणतात कि कन्या दान हे पुण्य दान आहे ...
पण खरतर आई बापाचा जीव त्याच्यापासून दूर जाण्याचा तो विरहाचा क्षण आहे ....
