STORYMIRROR

Sayli Kamble

Others

4  

Sayli Kamble

Others

जिद्द चालायची, ध्यैय गाठण्याची

जिद्द चालायची, ध्यैय गाठण्याची

1 min
241

विशाल अशा विश्वात आपण तसे अगदीच नगण्य

जन्म मिळाला म्हणून जगत रहाणे हा विचारही सर्वसामान्य


जसे प्रत्येक घटनेमागे काहितरी कारण आहे

तसेच प्रत्येक जन्मामागे ही काहितरी उददेश आहे


काहींना तो सापडतो, कोणी चाचपडतच राहतो

कोणी येईल तो दिवस ढकलत चक्क त्याकडे दुर्लक्ष करतो


काही ध्येय असेल तर एकाग्रता वाढते

जीवन सुखकर होऊन जीवनाला शिस्त लागते


यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवे

अडथळे येतील, पडायलाही होईल, पण जिद्दीने परत चालायला हवे


सहज मिळालेल्या यशाचे आयुष्य थोडे असते

पण संघष्राने मिळवलेले लक्ष्य सदैव प्रेरणादाई ठरते


Rate this content
Log in