झुरते तुझ्याविना
झुरते तुझ्याविना
1 min
205
सख्या का रें तु रुसला
काय घडला माझा गुन्हा
झुरतेय आता तुझ्याविना
विनविते तुला पुन्हा पुन्हा
ओळखीची खूणही पटली
मने दोघांची आता जुळली
साथ सोडून गेलास सख्या
चूक माझी नाही ना कळली
प्रेम बंधनात बांधलोय दोघे
का रें सख्या मन हे तोडले
सात जन्मांच्या या शपथा
अनुबंध होते माझे जोडले
ये नां सख्या परतूनि आता
नको हळवे हे मन तू मोडू
तव प्रीतीचा फुलु दे पिसारा
नाते प्रेमाचे नकोस तू तोडू
राजसा येशील ना मजकडे
केले हे हृदय तुजला बहाल
चांदण्यात फिरू दोघे प्रेमाने
नको सोडू सख्या प्रीत महाल
