झुंजूमंजू झालं
झुंजूमंजू झालं
1 min
467
झुंजूमुंजू झालं रविराज आला
सारी धरती प्रकाशमान झाली
अंधार लोपुन उजेड आला
सारा गाव आता जागा झाला
बळीराजा उठून सर्जाकडे आला
खाऊपिऊ घालून हात फिरवला
दिसभर राबवायचे आहे राजा तुला
कष्टाची भाकर मिळवायची मला
लेकीसुना साऱ्या जाग्या झाल्या
केला अंगणी सडा सारवण
जात्यावरच्या ओव्या गायल्या
आवरलं सार लाकूड सरपण
रविराजासंगे चैतन्य आले गावात
सोनपावलांची प्रभा पसरली चोहीकडे
सारीच कामे सुरू जाहली आनंदात
करू मेहनत वाट चासळू स्वप्नपूर्तीकडे
