झुंझार स्त्री
झुंझार स्त्री
1 min
405
कितीही येवोत अडथळे त्यातून ही येईन उभारून मी
कारण मी आहे एक झुंझार स्त्री.......
कितीही करो तिरस्कार माझा
पण मी हरणार नाही शब्द हा माझा
फिरवत नाही परिस्थितीमध्ये पाठ मी
कारण मी आहे एक झुंझार स्त्री.......
लक्षात ठेवा मी आहे एक हिरकणी
सोडून जात नाही कधी मैदान मी
झाशीच्या राणीची वंशज मी
मी आहे एक झुंजार स्त्री........
असेल मला खाली पाडण्याचा हेतू जरी
तरीही मी ढळणार नाही हरणार नाही
पुन्हां लढीन मी झुंझेल मी
कारण मी आहे एक झुंझार स्त्री......
कितीही येवोत अडथळे त्यातून ही येईन उभारून मी
कारण मी आहे एक झुंझार स्त्री.......
