झुंज
झुंज
आधुनिक युगातील स्त्री च्या व्यथा
अजूनही कुठे कुणा कळल्या
तिच्या न्याय, हक्कासाठी आजही
रस्त्यावर लाखो मेणबत्या वितळल्या
घर संसार सांभाळून नोकरी करणारी
स्त्री साऱ्यांनाच बिनधास्त वाटते
तिच्या निरागस हसऱ्या चेहऱ्यामागे
ती अनेक दुःख लपवताना दिसते
तिची होणारी ओढाताण, ऐकावी लागणारी
टोमणी कधीच कोणाला दिसत नाही
तिच्या मनाचा खरच होतोय का कोंडमारा
हे मात्र तिला कधीच कोणी पुसत नाही
पापी ,वासनाधीन नराधमांच्या नजरा चुकवत
हिम्मत उराशी बांधून ती आजही झुंज देत आहे
फरक एवढाच की काल शत्रूंशी झुंज देणारी स्त्री
आज स्वतःच्या अस्तित्वासाठी पदोपदी झुंजत आहे
किती सोसला वनवास,किती केला त्याग
युगे युगे सरली तरी कायम स्त्री उपेक्षित
अहो , स्त्री ला ५०% आरक्षण देऊनसुद्धा
ती आजच्या आधुनिक युगात आहे का हो सुरक्षित ?
