STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

झुळूक सुखाची

झुळूक सुखाची

1 min
367

माहेराच्या वाटेने आली

अशी झुळूक सुखाची

सय आली मायबाबांची

नव्हती झळही दु:खाची 


अंगणात बालपणीचाच

झुळझूळ थंडगार वारा

बरसूनी चिंब करायच्या

जलतूषारांच्या या धारा


रानामधूनी कोकिळेचा

पडे मंजूळ स्वर कानी

नदीतीरावरूनी गुंजती

मुरलीचे सुर पानोपानी


आडावरच्या रहाटाची

ऐकायचो नित्य कुईकूई

गुरेवासरे हूंदडती स्वैर

पाडसांच्या मागे या गाई

 

अंगणातले तुळशीवृंदावन

देतसे पावित्र्याचीच खूण

सायंकाळी नंदादीप वसे

अगत्याचा झेंडाच रोवून


अतिथी देवो भवचा नांदे

माहेराच्या घरातच मंत्र

पंचपक्वानाचा देता घास

वसे सुखसमृद्धीचेच तंत्र


Rate this content
Log in