झुगारा अंधश्रद्धा
झुगारा अंधश्रद्धा
अंधश्रद्धा अंधपणे, मनावर आरुढ
सारासार विवेकाचे, झुगारुन पांघरुण (1)
पगडा इतका घट्ट , मनाला पडे विळखा
नकळत करे हट्ट , विचाराला देती फाटा (2)
कोणी नवस देवाला , कोणी घाले प्रदक्षिणा
देई बळी पशूला , तर कोणी मानवाला (3)
बळी देण्याने का देव , प्रसन्न आपणां होई?
अश्राप मारुनी जीव , मनोरथ पूर्ण होई? (4)
देव प्रसन्न होतसे , निरपेक्ष कर्मातून
बळीची नसे अपेक्षा , घातकशा प्रथेतून (5)
झुगारुन टाका अशा , अंधश्रद्धा मनातून
विवेकी विचारांचाच , लगाम घ्यावा बांधून (6)
विज्ञानाधिष्ठित देश , सुविचारी हो जनता
डोळस श्रद्धा ठेवावी , हवी. प्रत्यक्षप्रमाणता (7
डॉक्टर दाभोळकरांनी , मतपरिवर्तन केले
भगीरथ प्रयत्न केले , प्राणांचेही बलिदान दिले (8)
एकविसावे शतक , अंधश्रद्धा झुगारेल
विज्ञानाधिष्ठित देश , प्रगतीपथ गाठेल (9)